शाळेतल्या मुलांच्या हातात असलेल्या मोबाइलमध्ये किती भयानक आणि विकृत पद्धतीने गेम आणि अ‍ॅप्स पोहोचतात त्याची झलक..    
दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणापाठोपाठ महिलांवरील हल्ले, विनयभंग, हत्या अशा आरोपांची अनेक प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शाळेतल्या मुलांच्याही हातात असलेल्या मोबाइलमध्ये या सर्व गंभीर बाबींवर आधारित गेम्स आणि अ‍ॅप्स यांचा खच पडला आहे. किती भयानक आणि विकृत पद्धतीने हे गेम आणि अ‍ॅप्स मुलांच्या हातात पोहोचतात त्याची ही झलक..
१. टॉर्न द क्लोथ्स (गेम) : या खेळात एका मुलीचा फोटो मोबाइलच्या स्क्रीनवर येतो. या मुलीने घातलेले कपडे केवळ आपल्या बोटांनी फाडायचे असतात. हा खेळ जपानमध्ये सुरू झाला.  या खेळामुळे मनातील भावनांचा निचरा होण्यास मदत होते, असेही या खेळाच्या वर्णनात म्हटले आहे.  डाउनलोड्स – ५० हजारांपेक्षा जास्त.
२. सेक्स जिगसॉॅ पझल (गेम) : या खेळात मोबाइलवर काही तुकडे दिसतात. हे तुकडे योग्य त्या ठिकाणी जोडल्यानंतर एका मादक मुलीचा फोटो स्क्रीनवर दिसतो. प्रत्येक खेळागणिक नवीन तुकडे जोडून नवीन मादक मुलगी मोबाइलच्या स्क्रीनवर दिसते. या मुलींचे फोटो वॉलपेपर म्हणून मोबाइलमध्ये सेव्ह करण्याची तरतूदही आहे. तसेच अशा असंख्य मुलींचे फोटो जिगसॉ पझलद्वारे जोडता येऊ शकतात. नग्नता हा या फोटोंमधील मुख्य निकष असतो. डाउनलोड्स – १ लाखापेक्षा जास्त.
३. रेप गेम (गेम) :   या गेममध्ये खेळणारी व्यक्ती बलात्कारी असते. यात विविध प्रसंग आणि त्या विविध प्रसंगांत विविध वयोगटांच्या महिला, मुली असतात. खेळणाऱ्या व्यक्तीला त्यांच्यावर बलात्कार करून पुढे जायचे असते. गंभीर बाब म्हणजे यात अल्पवयीन मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सगळ्याच वयोगटांतील महिलांवर अत्याचार करता येतो. अत्याचार करण्याच्या विविध तऱ्हा या खेळात उपलब्ध आहेत.  डाउनलोड्स – दीड लाखांपेक्षा जास्त.
४. हर सेक्सी बॉडी (अ‍ॅप) :  या अ‍ॅप्लिकेशनमध्ये सेक्ससंबंधी अनेक हाय डेफिनेशन व्हिडीओंचा समावेश आहे. या व्हिडीओमधील महिला उच्चभ्रू वस्तीतील आणि कोणाच्याही भावना चेतवणाऱ्या असतात.  या अ‍ॅप्लिकेशनमध्ये तुमचे लोकेशन शोधून तुम्हाला त्याप्रमाणे व्हिडीओ सुचवला जातो. डाउनलोड्स – ५० हजारांहून अधिक
५. इंडियन सेक्स स्टोरीज (अ‍ॅप) :  या अ‍ॅपमधील कथांची वर्गवारी केलेली आहे. यात ऑफिस सेक्स, सेक्स विथ टीचर, सेक्स विथ मेड, नातेवाइकांमधील शरीर संबंध अशा अनेक कथांचा समावेश आहे. सेक्सशी संबंधित बाजारातील अनेक मासिकांप्रमाणेच हे दर दिवशी अपडेट होणारे मायाजालावरील मासिक आहे.
डाउनलोड्स दीड लाखांपेक्षा जास्त. 

Story img Loader