सर्वच स्तरावरून ‘गांधीसागर’ तलावाच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न होत असताना पर्यावरण विभागाकडून अडथळा निर्माण होत आहे. गांधीसागर तलावाची स्थायी समितीचे सभापती अविनाश ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाकडून गांधासागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी देण्यात आला आहे. सौंदर्यीकरणाकरिता लागणाऱ्या खर्चातील ३० टक्के वाटा मनपाला द्यायचा असून त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. परंतु निर्माल्य गोळा करण्यासाठी आवश्यक  टँकची जागा बदलण्याची सूचना पर्यावरण संतुलन विभागाकडून केली आहे. प्रमाणपत्र व सहकार्य पर्यावरण व पुरातन विभागकडून मिळत नाही म्हणून  हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही.
शासनाकडे सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा लागत असल्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढली आहे. ना हरकत प्रमाणपत्र शासनाने प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देताना संबंधित विभागाकडून उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अविनाश ठाकरे यांनी केली आहे. त्याप्रमाणे २० कोटीचा खर्च हा गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणावर येणार असून हा प्रकल्प बीओटी तत्वावर पूर्ण करण्याचा विचार अविनाश ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यावेळीलक्ष्मीनगर झोनचे सभापती गोपाल बोहरे, धंतोली झेानचे सभापती सुमित्रा जाधव, नगरसेवक दीपक पटेल, सुधीर राऊत, हर्षला साबळे, रश्मी फडणवीस, कार्यकरी अभियंता होतवाणी उपस्थित होते.

Story img Loader