न्यू कॉलेज महाविद्यालयात विद्यार्थी संघटना संघर्ष समितीतर्फे प्राध्यापकांच्या संपाविरुद्ध गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
न्यू कॉलेज महाविद्यालयात संयुक्त विद्यार्थी संघटना संघर्ष समितीतर्फे प्राध्यापकांच्या संपात सहभागी असलेल्या प्राध्यापकांना समितीच्या कार्यकर्त्यांतर्फे गुलाबपुष्प देऊन ‘संप मागे घ्या, परीक्षा वेळेत घ्या’ अशी घोषणाबाजी केली. तसेच एम.फुक्टोशी सुटा याने सतत चर्चा न करता शिवाजी विद्यापीठाच्या अधिपत्याखालील असलेल्या सुटा या संघटनेने त्यांचा संप मागे घेऊन परीक्षा वेळेत घेण्याचे आवाहन केले. यापुढे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करूनसुद्धा प्राध्यापकांनी संप मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा समितीने दिला. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी सुटा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन संप मागे घेण्याची विनंती केली. या वेळी समितीचे निमंत्रक, शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अवधूत अपराध, रोहित पाटील, अक्षय नायकवडी, अभिजित राऊत, मंदार पाटील, श्रीकांत राऊत, करण शिंदे आदी उपस्थित होते.
प्राध्यापकांच्या संपाविरुद्ध विद्यार्थ्यांची गांधीगिरी
न्यू कॉलेज महाविद्यालयात विद्यार्थी संघटना संघर्ष समितीतर्फे प्राध्यापकांच्या संपाविरुद्ध गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
First published on: 04-04-2013 at 01:22 IST
TOPICSप्राध्यापक
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandhigiri of student against professors strike