दोन कोटींचा निधी मंजूर
कल्याणचे ऐतिहासिक प्रवेशद्वार असलेल्या दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेशघाटाच्या सुशोभीकरणासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभागाने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतील ३० लाखांचा पहिला हप्ता जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.
खाडी किनाऱ्याजवळील चार हेक्टर जागेत सुशोभीकरण करून शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कल्याण शहराला देखणे रूप द्यावे या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून मनसे आमदार प्रकाश भोईर यांनी शासनाकडे या सुशोभीकरणाच्या निधीसाठी पाठपुरावा केला होता. पर्यटन सचिन सोनी, कक्ष अधिकारी आ. बा. डमाळे यांच्या सहकार्यामुळे १ कोटी ९४ लाखांचा निधी या सुशोभीकरणाच्या कामासाठी मिळाला, असे आमदार भोईर यांनी सांगितले.
ठाणे जिल्हा विकास नियोजन समितीने गणेशघाट परिसराला ‘ड’ वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून हा परिसर विकसित करण्यात येणार आहे. या भागात विद्युत रोषणाई, नौकानयन, नागरिकांच्या अत्यावश्यक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येतील, असे आ. भोईर यांनी सांगितले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा