कोपरगावला शिवसेनेचे आंदोलन
शहरात योग्य रितीने साफसफाई केली जात नाही, गटारी तुंबल्यामुळे डासांचे साम्राज्य पसरल्याने शिवसेनेच्या संतप्त नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष सुरेखा राक्षे, मुख्याधिकारी शिवाजी कापरे व आरोग्य समितीचे सभापती बबलू वाणी यांच्या दालनात आज गाळ व कचरा आणून टाकला.
विरोधकांच्या या कृत्याचा राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपप्रणित लोकसेवा आघाडीचे नगराध्यक्ष राक्षे व नगरसेवकांनी जाहीर नेषेध केला आहे. कापरे यांनी तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून कायदेशीर कारवाईचा ईशारा दिल्याचे वाणी यांनी सांगितले.
सेनेचे नगरसेवक राजेंद्र झावरे, कृष्णा आढाव उपप्रमुख भरत मोरे, काका शेखो, विजय आढाव या माजी पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापतीचे दालनांत गाळ व कचरा आणून टाकत ठराविक भागातच स्वच्छता करण्यात येत असल्याची तक्रार केली. त्यामुळे शहरांत डासांचे प्रमाण वाढले आहे, रोगराई पसरत आहे अशा तक्रारी त्यांनी केल्या. वाणी यांनी सोंगितले की, ठेकेदाराने मागील कामे न केल्याने त्यांची बिले दिली नाहीत. युवक नेते बिपीन कोल्हे यांचे पुढाकाराने सध्या ६ हेक्टर २ जेसीबीने साफसफाईचे काम गेल्या दोन दिवसापासून हाती घेतले आहे. मात्र नगराध्यक्ष राक्षे या मागासवर्गीय महिला असल्याने त्यांना जाणूनबुजून त्रास देवून राजकारण करीत आहेत व गावांत अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्याधिकारी कापरे बाहेरगावी गेल्याने त्यांची आपण आल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे. गावातील साफसफाई करण्यासाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी आहे. याची सर्व कल्पना विरोधी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना असतांना ते राजकीय स्वार्थापोटी भांडवल करू पाहात असल्याचा आरोप सभापती वाणी यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा