विनापरवाना घरगुती गॅसची वाहतूक करणारा अ‍ॅपे शहर पोलिसांनी खामगांव येथील हॉटेल गौरवसमोर पकडला आहे. याप्रकरणी अ‍ॅपेचालकाला अटक करून अ‍ॅपेसह साडेपाच लाखाचा माल जप्त केला आहे. यामध्ये ९ सिलेंडरचाही समावेश आहे.
पिंपळगांव राजा, तालुका खामगांव येथील संजय काशिराम चोपडे वय ३८ हा विना नंबरच्या पिवळया रंगाच्या अ‍ॅपेमध्ये भरलेले ४ व खाली ५ असे ९ घरगुती सिलेंडर घेवून जात असल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यु.के.जाधव यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी पीएसआय कावरे व पोलिस जमादार जायभाये, एएसआय इंगळे, सुरेद्रसिंग चव्हाण, तौर आदीच्या माध्यमातून सापळा रचला त्यावेळी सदर अ‍ॅपेत हॉटेल गौरव, नांदुरा रोड येथे येताच ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी अ‍ॅटोत ४ भरलेले व ५ खाली असे सिलींडर मिळून आले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी संजय चोपडे विरूध्द जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे व त्याच्या ताब्यातील अ‍ॅपे ४ लाख रूपये, रिकामे व भरलेले गॅस सिलेंडर किंमत ८३ हजार रूपयाचा माल जप्त केला आहे. अधिक तपास पीएसआय कावरे करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा