सूरत येथे गॅस भरल्यानंतर टँकर येथील इण्डेन गॅस प्रकल्पात आणला जात असताना रस्त्यात सुमारे एक लाख २० हजार रुपये किंमतीएवढा गॅस टँकरमधून काढून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत टँकरचालकाविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुजरातमधील जवाहरनगरचे अर्जुन सोळंकी यांनी या घटनेची तक्रार मनमाड पोलीस ठाण्यात दिली आहे. स्वयंपाकाचा गॅस भरून टँकर मनमाडजवळील पानेवाडी येथील इंडियन ऑइल गॅसच्या प्रकल्पात आला.
याठिकाणी टँकरचे वजन करण्यात आले असता वजन कमी भरले. या टॅंकरमधील काही प्रमाणात गॅस काढून घेतल्याचे स्पष्ट झाले. कंपनीने तातडीने टँकरमालकाला कळविले.
हा प्रकार उघडकीस येताच टँकरचालक खलील नमजाद (रा. प्रतापगढ, उत्तरप्रदेश) फरार झाला. त्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टँकरमधून लाखाच्या गॅसची चोरी
सूरत येथे गॅस भरल्यानंतर टँकर येथील इण्डेन गॅस प्रकल्पात आणला जात असताना रस्त्यात सुमारे एक लाख २० हजार रुपये किंमतीएवढा गॅस टँकरमधून काढून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
First published on: 29-11-2012 at 12:31 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas robbery by tanker