कराड तालुका वारकरी संघाच्या रौप्य महोत्सव वर्षी समाप्ती, गुरुवर्य मारुतीमामा कराडकर यांचे महानिर्वाण शताब्दीवर्षांनिमित्त आणि गुरुवर्य भगवानमामा कराडकर मठाधिपती पुरस्कार अशा संयुक्त कार्यक्रमानिमित्त कृष्णा-कोयना प्रीतिसंगम येथे येत्या २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत श्री निळोबाराय गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात बाळासाहेब महाराज (देहूकर), जयवंत महाराज (बोधले), पांडुरग महाराज (घुले), संदिपान महाराज, रामभाऊ राऊत, चैतन्य महाराज (देंगुलकर) व लक्ष्मण महाराज (कोकाटे) हे कीर्तन सेवा करणार आहेत. तसेच अभय भंडारी, यशवंत पाटणे, इंद्रजित देशमुख, काडसिद्धेश्वर महाराज व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्याने होणार आहेत तरी पारायण सोहळय़ातील ज्ञानेश्वरी वाचनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी आपली नावनोंदणी कराडकर मठ या ठिकाणी करावी असे आवाहन बाळासाहेब जगताप, जगदीश कुलकर्णी, सुभाष पाटील यांनी केले आहे.