येथील एका कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ डॉ. ए. बा. ब्राह्मणकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘आनंदयात्री ज्ञानतपस्वी डॉ. ए. बा. ब्राह्मणकर गौरव’ ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. अ‍ॅप्सी ग्रुप मुंबईचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक किरणभाई पटेल, तुकाराम दिघोळे, डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य मो. भा. लिमये, अरुण घाटोळ हे प्रमुख पाहुणे होते. शाल, पुष्पगुच्छ, पुष्पहार, सन्मानपत्र व सन्माचिन्ह देऊन डॉ. ब्राह्मणकर यांचा गौरव करण्यात आला. ५२ वर्षांत डॉ. ब्राह्मणकर यांनी वाणिज्य व व्यवस्थापनाच्या उच्च शिक्षणात दिलेले योगदान दीपस्तंभासारखे मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचे डॉ. गोसावी यांनी नमूद केले. ब्राह्मणकर यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे संस्थेच्या विविध महाविद्यालयांच्या गुणवत्तेत मोलाची भर पडली आहे. या सर्व वाटचालीत विजया ब्राह्मणकर यांनी खंबीर साथ दिल्याचा उल्लेख नीलिमा पवार यांनी केला. ब्राह्मणकरांच्या योगदानामुळे व्ही. एन. नाईक संस्थेने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश केल्याचे दिघोळे यांनी सांगितले. सोनल ब्राह्मणकर यांचे स्वागतगीत झाले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. के. आर. शिंपी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा