आशिया खंडातील पहिले वाणिज्य महाविद्यालय अशी ओळख असलेल्या ‘सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालया’ला २२ ऑक्टोबर, २०१३ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्ताने १६ मार्चला माजी विद्यार्थ्यांचे संमेलन भरविण्यात येणार आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी औद्योगिक, प्रशासकीय, वित्त, क्रीडा, शिक्षण, राजकीय, नाटय़, अभिनय अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांना शतक महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने एकत्र आणण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे. यासाठी १६ मार्चला दुपारी ४ वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला परदेशातील माजी विद्यार्थीही उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ‘गुरुयोग म्युझिकल प्रोग्रॅम’च्या संचालिका योगिता चितळे यांचा हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात स्नेहभोजन होईल. संमेलनात जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य माधुरी कागलकर यांनी केले             आहे.  
यासाठी १० मार्चपर्यंत प्रा. अंजली आळेकर (९८६९५४०१३३) आणि प्रा. सुनिल सिंग (९८६९३०९२७०) यांच्यासी दूरध्वनीवर संपर्क साधायचा आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – http://www.sydenham.ac.in

Story img Loader