१९७१ पासून घंटाळी मित्र मंडळाचा योग विभाग सुरू झाला आणि पुढील काळात योग प्रशिक्षण ही या संस्थेची प्रमुख ओळख बनली. दिवंगत योगाचार्य का. बा. सहस्रबुद्धे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या योग प्रसार कार्याचा आता महावृक्ष बनला आहे. कोणतेही शुल्क न घेता मानवाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यास लाभदायक ठरणारी ही साधना मंडळातर्फे शिकवली जाते हे विशेष. योग प्रसाराचे हे कार्य आता ठाण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. पुणे आणि मुंबईतही घंटाळी मित्र मंडळाचे योग वर्ग भरतात. गेल्या चार दशकांच्या कालावधीत मंडळाच्या योग शाखेने २०० योग प्रशिक्षक तयार केले आहेत. त्यात २५ डॉक्टर्स आहेत. ते विनामूल्य योगाचा प्रसार करीत आहेत.
सध्याच्या काळात ताणतणावाचे व्यवस्थापन (स्ट्रेस मॅनेजमेंट) हा परवलीचा शब्द झाला आहे. मात्र दैनंदिन जीवनातील ताणांना योग साधनेद्वारे कसे तोंड द्यावे याचे प्रशिक्षण घंटाळी मित्र मंडळाचे स्वयंसेवक गेली चार दशके देत आले आहेत. पश्चिम रेल्वेत ३५ वर्षे नोकरी करून अण्णा व्यवहारे निवृत्त झाले. योग प्रसाराचे त्यांचे कार्य मात्र अजूनही सुरू आहे. गेली सलग तीस वर्षे मंडळाच्या घंटाळी येथील कार्यालयात ते सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सात ते आठ यावेळेत योगापचाराचे सल्ले देत आहेत.
या व्यतिरिक्त १९७८ पासून मंडळाच्या वतीने निरनिराळ्या ठिकाणी योग जागृती संमेलने भरविण्यात आली आहेत. योगाचा अधिक प्रसार व्हावा या हेतूने मंडळाने वेळोवेळी रंजक आणि मनोरंजक कार्यक्रमही सादर केले. त्यात ‘रोग मनाचा-शोध मनाचा’, नादब्रह्म, प्रेरणा, भक्तिगंगा, रंग चैतन्याचे, माय मराठी, ब्रह्मसाधना आणि उजळला प्रकाशु आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त मंडळाचा स्वतंत्र प्रकाशन विभाग आहे. त्याद्वारे आनंद योग (लेखक-श्रीकृष्ण व्यवहारे), सायन्स ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड योग (श्रीधर जोशी), पातंजल योग-सूत्रे व अर्थ (स्वामी आनंदऋषी), शुद्धिप्रक्रिया (लता महाजन), रक्तदाब आणि योग (श्रीधर जोशी), मेधा संस्कार (श्रीकृष्ण व्यवहारे) वेदमाता गायत्री (डॉ. शांताराम आपटे) आदी पुस्तके प्रकाशीत आहेत. सुवर्ण महोत्सवानिमित्त सध्या १७ ते २३ जानेवारी दरम्यान सहयोग मंदिर येथे संस्थेतर्फे योग सप्ताह सुरू आहे.
योग तुझा घडावा..
१९६३ मध्ये श्रीकृष्ण ऊर्फ अण्णा व्यवहारे मुंबईतील दादर येथील जागा सोडून ठाण्यात राहायला आले. त्यावेळी आता अगदी मध्यवर्ती ठिकाण असलेले घंटाळी देवीचे मंदिर तसे गावाबाहेर होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-01-2015 at 12:05 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghantali mitra mandal completed 50 years in social field