गझल गायनासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळविणाऱ्या गायिका पूजा गायतोंडे यांचा ‘गझल सुफियाना’ हा गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवार, २८ जून रोजी रात्री ८ वाजता वीर सावरकर सभागृह, स्वा. सावरकर स्मारक, शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.
पं. ए सी आर भट यांची शिष्या असलेल्या पूजा गायतोंडे यांनी शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, गझल गायनाचे शिक्षण घेतले आहे.
या कार्यक्रमाला अनुप जलोटा, कविता सेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मैफलीचे संगीत संयोजन परेश एन शाह यांनी केले असून मेहदी हसन, जगजित सिंग, आशा भोसले, अनुप जलोटा आदींनी गायलेल्या लोकप्रिय गझला पूजा गायतोंडे सादर करणार आहेत. मैफलीचे सूत्रसंचालन प्रज्ञा विकास आणि औबेद आझमी करणार आहेत.
शुक्रवारी ‘गझल सुफियाना’
गझल गायनासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळविणाऱ्या गायिका पूजा गायतोंडे यांचा ‘गझल सुफियाना’ हा गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवार, २८ जून रोजी रात्री ८ वाजता वीर सावरकर सभागृह, स्वा. सावरकर स्मारक, शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.

First published on: 27-06-2013 at 03:38 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghazal sufiyana on friday