भटक्या विमुक्त चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, साहित्यिक जनाबाई गिऱ्हे व के. ओ. गिऱ्हे या दाम्पत्यावरील ‘मजल दरमजल’ या गौरवग्रंथाचा लोकार्पण सोहळा २७ नोव्हेंबरला आयोजित केला आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात संध्याकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल.
गौरवग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांच्या होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन प्रकाशन समितीचे सदस्य, सचिव व विचारवंत प्रा. अविनाश डोळस आहेत. ज्येष्ठ समीक्षक प्रा. प्रल्हाद लुलेकर, भटक्या-विमुक्त चळवळीचे भाष्यकार डॉ. सुधीर अनवले, तसेच पैठणचे नगराध्यक्ष राजू गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
भटक्या-विमुक्त चळवळीचा इतिहास व वेदना जगासमोर मांडणाऱ्या या दाम्पत्याचा सत्कार व गौरवग्रंथ लोकार्पण सोहळय़ास साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. शिवाजी वाठोरे व एकनाथ खिल्लारे यांनी केले आहे.    

Story img Loader