कळंबोली परिसरातील एका बारावीच्या विद्यार्थिनीचा शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तापाने फणफणली होती. तिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. हा ताप डेंग्यूसदृश असल्याचा प्राथमिक अंदाज एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. ऐश्वर्याचा मृत्यू डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे झाला असल्याचे मत महाजन यांचे नातेवाईक आणि सुधागडच्या अनेक शिक्षकांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे पनवेल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या तुटवडय़ाचा फटका आज ऐश्वर्याच्या नातेवाईकांनादेखील सहन करावा लागला. येथे लागोपाठ तीन डय़ुटय़ा करणाऱ्या एकाच डॉक्टरांना अलिबागला जावे लागल्याने येथे दुसरे डॉक्टर उपलब्ध नव्हते. अखेर ऐश्वर्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशी येथील पालिका रुग्णालयात नेण्यात आला आहे.
डेंग्यूसदृश तापाने विद्यार्थिनीचा बळी
कळंबोली परिसरातील एका बारावीच्या विद्यार्थिनीचा शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तापाने फणफणली होती.
First published on: 23-08-2014 at 06:39 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl death by fever