शेतातील काम आटोपून घराकडे निघालेली मुलगी वाटेत ओढय़ाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेली. तिचा संध्याकाळपर्यंत शोध लागू शकला नव्हता. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास हिंगोली तालुक्यात हा प्रकार घडला. यशोदा गणेश गिरी (वय १५, गोरीशिकारी, तालुका हिंगोली) असे या मुलीचे नाव आहे. शेतातील काम आटोपून आपल्या घराकडे ती पायी चालत निघाली होती. मात्र, रस्त्यात ओढय़ाला पुराचे पाणी वाहात असताना अंदाज न घेताच यशोदा पाण्यात उतरली. पुढे जाण्याच्या प्रयत्नात ती वाहून गेली. संध्याकाळी उशिरापर्यंत तिचा शोध लागू शकला नव्हता.

Story img Loader