शहरी भागाशी तुलना करता, ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण आजही फार कमी आहे. ग्रामीण भागात सुविधांचा अभाव हेच त्याचे मुख्य कारण आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी येथे केले.
सावित्रीबाई शाळेतील मुलींच्या वसतिगृहाचे उदघाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.  आमदार पंकजा मुंडे-पालवे, खासदार दिलीप गांधी, आमदार राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार बाळा हेगडे, प्रताप ढाकणे, नामदेव राऊत, सभापती सोनाली बोराटे आदी या वेळी उपस्थित होते. तालुक्यातील मुलींचे हे पहिलेच वसतिगृह आहे. विनोद दळवी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ते सुरू केले आहे.
मुंडे म्हणाले, की ग्रामीण भागात शालेय स्तरापर्यंत मुलींची संख्या चांगली असते, मात्र त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणात मुलींची संख्या घटते. चांगल्या शैक्षणिक सोयींचा अभाव, सुरक्षिततेचा प्रश्न आणि पालकांकडून होणारी लग्नाची घाई यामुळे ही स्थिती आहे. अशाही स्थितीत मात्र विनोद दळवी यांनी सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील मुलींना त्यामुळे शिक्षणाची योग्य सोय होऊ शकते असे मुंडे म्हणाले. देशात सावित्रीबाई फुले यांनी स्त्र शिक्षणाचा पाया घातला. त्यामुळे मुलींना शिक्षण घेता येऊ लागले असेही त्यांनी सांगितले. दळवी यांनी सर्वांचे स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा