एखादा तरुण त्रास देत असेल तर आता विद्यार्थिनीला पोलीस ठाण्यात जावे लागणार नाही. पोलिसांकडून महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता तक्रार पेटी लावण्यात येणार असून, त्यात जमा झालेल्या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
शहर पोलीस दलाच्या उत्तर विभागातील सोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे. उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेखला व पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.
सध्या शंभर तक्रार पेटय़ा तयार करण्यात आल्या असून त्यातील काही तक्रार पेटय़ांचे पोलीस ठाण्याला वाटपही झाले आहे. या तक्रार पेटीवर पोलीस ठाण्याचे नाव, येथील दूरध्वनी क्रमांकाची नोंद असेल. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविद्यालयात ही तक्रार पेटी बसविण्यात येईल. आठ दिवसांनी संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी ती बंद असलेली पेटी उघडून त्यामधील तक्रार पहातील. आलेल्या तक्रारीनुसार संबंधित तरुणावर किंवा व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा