दिवसेंदिवस मुलींचा घटता जन्मदर हा चिंतेचा विषय असून, प्रवरा परिसरातील १०० गावांमध्ये मुलींचा सव्र्हे करण्यात येणार असून, ज्या घरात मुली जन्मल्या असतील, त्या गरजू मुलींच्या वैद्यकीय व इतर शिक्षणासाठी आपण मदत करून, या मुली दत्तक घेणार आहोत, अशी घोषणा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांनी केली.
लोणी येथील प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षकि पारितोषिक व स्नेहसंमेलनात विखे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी संस्थेचे सचिव डॉ. संपतराव वाळुंज, सहसचिव डॉ. जयसिंगराव भोर, प्राचार्या डॉ. डी. लक्ष्मीप्रसन्ना, प्रवरा पब्लिक स्कूलचे संचालक कर्नल फ्रान्सिस मथाई, डॉ. संपतराव आहेर, प्राचार्या नलिनी घाटगे, प्राचार्या अंजली बोधाई आदी उपस्थित होते.
वाढत्या स्त्रीभ्रूणहत्येविषयी चिंता व्यक्त करून विखे म्हणाले, की ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या आईवडिलांनी अभिमान वाटावे असे करावे. दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत आहे. प्रवरा परिसरातील गावांमध्ये, ज्या कुटुंबात संततिनियमनाचे पालन केले आहे किंवा नाही तसेच मुलींचाही सव्र्हे करण्यात येणार आहे. ज्या कुटुंबात मुली असतील, परंतु आíथक परिस्थिती अभावी त्या शिक्षण घेऊ शकत नसतील, अशा मुलींना आपण दत्तक घेऊन, वैद्यकीय तसेच इतरही शिक्षणासाठी मदत करणार आहोत.
प्रवरेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी पुढील वर्षांपासून सर्व महाविद्यालयात ई-लìनग व लॅपटॉपमार्फत शिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही विखे यांनी सांगितले. प्राचार्या डॉ. डी. लक्ष्मीप्रसन्ना यांनी विद्यालयाचा शैक्षणिक आढावा घेतला. शिक्षण क्षेत्रात लक्ष्मीप्रसन्ना यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यातआला. या वेळी विविध क्षेत्रांत नैपुण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंना गौरविण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा