मांगल्याचा आणि आनंदाला उधाण देणाऱ्या दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण विदर्भासह बुलढाण्याची बाजारपेठ सजली असून रस्त्याच्या कडेला दुतर्फाही विक्रेत्यांनी या सणाला साजेशा साहित्याची दुकाने थाटली आहेत.  
उद्या लक्ष्मीपूजनासाठी घरी पोहोचण्यासाठी बाहेरगावी नोकरी करणारे नोकरदार व विद्यार्थी गावाकडे मोठय़ा संख्येने परतत आहेत. ही संख्या लक्षात घेऊन एस.टी. महामंडळानेही मराठवाडा, खान्देश, पुणे नागपूरसाठी अतिरिक्त बसगाडय़ांची व्यवस्था करून प्रवाशांची गरसोय दूर केली आहे. बाजारात २५ ते ४० रुपये किलो प्रमाणे फरसाण तयार करून मिळत आहेत.
शहरात पन्नास फटाक्यांची दुकाने बाजारात थाटली असून ग्रामीण भागातील लोकही मोठय़ा प्रमाणात फटाके खरेदी करताना दिसत आहेत. पगारवाढ, दिवाळी बोनस, फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्समुळे नोकरदारही फटाक्यांची धूमधडाक्यात खरेदी करीत आहेत. फटाक्यांची दरवर्षी ५० लाखांपर्यंत उलाढाल होते. फटाक्याचे गिप्ट हॅंपरही पाचशे रुपयांपासून दोन हजारांपर्यंत उपलब्ध आहेत, मात्र फटाक्यांच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा