दारणा प्रकल्पातून जायकवाडी धरणास पाणी देत असताना त्याचवेळी गोदावरी कालव्यावरील शेती सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी मुंबई येथे दिली.
जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी गुरुवारी मुंबईत या भागातील लोकप्रतिनिधींची बैठक सकाळी १० वाजता घेतली. त्यास माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आमदार प्रसाद तनपुरे, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार शंकरराव गडाख, आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घन:श्याम शेलार आदींना पाचारण करण्यात आले होते.
या बैठकीत जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी सर्वाची मते जाणून घेऊन जायकवाडी भागास पाणी देत असताना गोदावरी कालव्यांवरील शेती पिकांना तत्काळ पाण्याचे आर्वतन दिले
जाईल, असे सांगून याप्रकरणी वाद विवाद थांबविण्यात यावा असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या भावनांचा अंत न पाहता गोदावरी कालव्यांना तत्काळ पाण्याचे आवर्तन सोडण्यात
येईल, असे ते शेवटी म्हणाले.     

Story img Loader