कर्ज वसुलीसाठी शाळेची इमारत बँकेने लिलावात विकलेल्या अंबरनाथ येथील गोखले-रहाळकर विद्यालय इमारतीबाबत अद्याप कोणताही तोडगा निघू न शकल्याने विद्यार्थी व शिक्षक दिवाळीची सुट्टी संपून दोन दिवस झाले तरी रस्त्यावर आहेत. यासंदर्भात आता कर्ज वसुली प्राधिकरणाकडे संस्थेने अपील केले असून या प्रकरणी २९ नोव्हेंबर रोजी निर्णय होणे अपेक्षित आहे. संस्थेने कर्जाची रक्कम भरण्याची तयारी दाखवूनही बँकेने या भूखंडावर शाळा असल्याची वस्तुस्थिती दडवून हा व्यवहार घडवून आणल्याचा आरोप संस्थाचालक सगुण भडकमकर यांनी केला आहे. मात्र ऐन दिवाळीत शाळेचे दिवाळे निघण्यास संस्था चालकांची बेफिकीरीच कारणीभूत असल्याचा स्पष्ट आरोप करीत शिक्षकांनी याप्रकरणी आता शासनाने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
शाळेचे कर्ज फेडण्यासाठी संस्थेने आता १६ लाख रूपये गोळा केले आहेत. त्यातील ११ लाख रूपये शिक्षकांनीच दिले आहेत.  शाळेची इमारत बांधण्यासाठीही आम्ही पैसे दिले होते, असे दावा करीत शिक्षकांनी संस्था चालकांच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा