जिल्हय़ातील दरडोई उत्पन्न राज्यातच नव्हे तर देशात अधिक असण्याचे कारण गोकुळने या जिल्हय़ात श्वेतक्रांती घडविल्यामुळेच आहे. म्हणूनच गोकुळ समृद्धीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन बॉर्डर बल्ड फौंडेशन, पुणे व जम्मू याचे प्रमुख अ‍ॅड. मस्जिद शेख यांनी गोकुळला दिलेल्या भेटीप्रसंगी केले. त्यांच्यासमवेत जम्मू काश्मीर सीमाभागातील जवळजवळ ३० कार्यकर्ते उपस्थित होते.     
अ‍ॅड. शेख म्हणाले, गोकुळसारख्या संस्था देशाच्या विशेष करून सीमाभागात उभ्या राहाव्यात आणि त्याच्या माध्यमातून दुर्गम व मागास भागाचा विकास साधाला जावा, अशी अपेक्षा अ‍ॅड.शेख यांनी यावेळी व्यक्त केली. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी काश्मिरी बांधवांचे गोकुळतर्फे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी या अभ्यास दौऱ्यातील प्रतिनिधींना सहकाराच्या माध्यमातून गोकुळने दुग्ध व्यवसायात घडवलेली क्रांती याबाबत सविस्तर माहिती दिली. या अभ्यासदौऱ्याचे नियोजक अदिक कदम यांनी या भेटीमागील उद्देश स्पष्ट केला. या वेळी गोकुळचे सर्व संचालक, संचालिका तसेच मोहन निंबाळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader