इचलकरंजी येथे महिलेच्या गळ्यातील सव्वा चार तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी धूम स्टाईलने लांबविले. हा प्रकार मंगळवारी झेंडा चौक परिसरात घडला. गावभाग पोलीस ठाण्यामध्ये विमल दादा पाटील(वय ३५ रा.चंदूर, ता.हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे.     
विमल पाटील यांचे माहेर इचलकरंजीतील टाकवडे वेस भागामध्ये आहे. तेथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. त्यांच्या पाहुण्यांनी त्यांना उत्तम-प्रकाश चित्रमंदिर जवळ दुचाकीवरून आणून सोडले. तेथून त्या चालत झेंडा चौकाकडे जात होत्या. सेवा भारती इस्पितळाजवळून त्या जात असतांना मागून दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील दागिने हिसका मारून लांबविले. दुचाकीच्या मागे बसलेल्या चोरटय़ाने दागिने चोरले. चोरीस गेलेल्या दागिन्यामध्ये दोन तोळ्यांचे गंठण, सव्वा ग्रॅमची सोनसाखळी,एक तोळ्याचे मंगळसूत्राचा समावेश आहे. दागिन्यांची किंमत ३२ हजार रूपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader