बुलडाणा येथील महाबोधी बुध्दविहाराचे काम अंतिम टप्प्यात असून मार्बल बसविणे, बुध्दमूर्ती बसविणे इत्यादी कामे प्रगतिपथावर आहेत. बुध्दविहाराच्या कामात आपलाही काही सहभाग
असावा, यासाठी येथील मायावती सुरोशे यांनी महिला मुक्तिदानाचे औचित्य साधून बौध्द महिला मेळाव्यात आपल्या गळ्यातील मंगळसूत्र सहा हजार रुपयांत
विकून आलेली रक्क म बौद्धविहाराच्या विकासकामासाठी दान दिली.
वाढत्या महागाईच्या काळात विहाराचे काम पूर्ण करण्याचे समिती सदस्यांसमोर आव्हान आहे. पैशासाठी होणारी तारांबळ लक्षात घेता येथील एकतानगरमधील मायावती अनंतराव सुरोशे यांनी या पध्दतीने  ही रक्क म त्यांनी त्यांच्या आई इंदूबाई सुकदेव इंगळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दान दिली.     
त्यांच्या या दानशूर वृत्तीचे महाबोधी बुध्दविहार धम्मगिरी येथे पार पडलेल्या बौध्द महिला मेळाव्यात क ौतुक करण्यात आले. याप्रसंगी भदन्त प्रज्ञारश्मी, स्वरानंदज प्रामुख्याने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष शाहीर वा.का.दाभाडे, सचिव माणिकराव निस्वादे व शहरातील अनेक प्रतिष्ठित उपासक, उपासिका उपस्थित होते.