बुलडाणा येथील महाबोधी बुध्दविहाराचे काम अंतिम टप्प्यात असून मार्बल बसविणे, बुध्दमूर्ती बसविणे इत्यादी कामे प्रगतिपथावर आहेत. बुध्दविहाराच्या कामात आपलाही काही सहभाग
असावा, यासाठी येथील मायावती सुरोशे यांनी महिला मुक्तिदानाचे औचित्य साधून बौध्द महिला मेळाव्यात आपल्या गळ्यातील मंगळसूत्र सहा हजार रुपयांत
विकून आलेली रक्क म बौद्धविहाराच्या विकासकामासाठी दान दिली.
वाढत्या महागाईच्या काळात विहाराचे काम पूर्ण करण्याचे समिती सदस्यांसमोर आव्हान आहे. पैशासाठी होणारी तारांबळ लक्षात घेता येथील एकतानगरमधील मायावती अनंतराव सुरोशे यांनी या पध्दतीने ही रक्क म त्यांनी त्यांच्या आई इंदूबाई सुकदेव इंगळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दान दिली.
त्यांच्या या दानशूर वृत्तीचे महाबोधी बुध्दविहार धम्मगिरी येथे पार पडलेल्या बौध्द महिला मेळाव्यात क ौतुक करण्यात आले. याप्रसंगी भदन्त प्रज्ञारश्मी, स्वरानंदज प्रामुख्याने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष शाहीर वा.का.दाभाडे, सचिव माणिकराव निस्वादे व शहरातील अनेक प्रतिष्ठित उपासक, उपासिका उपस्थित होते.
बुद्धविहारासाठी विकले मंगळसूत्र!
बुलडाणा येथील महाबोधी बुध्दविहाराचे काम अंतिम टप्प्यात असून मार्बल बसविणे, बुध्दमूर्ती बसविणे इत्यादी कामे प्रगतिपथावर आहेत. बुध्दविहाराच्या कामात आपलाही काही सहभाग
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-01-2013 at 12:36 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold wedding chain sales for construction of budha temple