दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांची सांगता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत उद्या (शनिवारी) होत आहे. राज्यपाल के. शंकरनारायण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सुवर्णमहोत्सवी जयंती समारोह समितीचे अध्यक्ष अरिवद सोनवणे कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. सुमारे १५ हजार उपस्थितांसाठी बंदिस्त मंडपाची व्यवस्था केली आहे. संस्थेच्या क्रीडांगणावर विशेष मंडप उभारला आहे. नऊ प्रवेशद्वारांतून वेगवेगळय़ा मंडळींसाठी स्वतंत्र पासेसची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे संयोजकांनी कळवले आहे.

Story img Loader