देवेंद्र पेम लिखित आणि दिग्दर्शित ‘ऑल दे बेस्ट’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर नवा इतिहास आणि वेगवेगळे विक्रम केले. पेम यांच्या ‘अनामय’ संस्थेतर्फे नव्याने हे नाटक रंगभूमीवर सादर करण्यात आले असून नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग १४ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभलेल्या या नाटकावर आधारित हिंदी चित्रपटही तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे नाटकाची लोकप्रियता लक्षात घेऊन या एकाच नाटकाचे तीन स्वतंत्र चमू तयार करण्यात आले होते. हे तीनही चमू वेगवेगळ्या नाटय़गृहात नाटकाचे प्रयोग करत होते. आता नव्या संचात पुन्हा एकदा रंगभूमीवर सादर झालेल्या ‘ऑल द बेस्ट’ने पन्नास प्रयोगापर्यंत मजल मारली आहे. या प्रयोगाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमही त्या दिवशी सादर होणार आहे. शिवाजी मंदिर येथे होणाऱ्या या प्रयोगास मराठी नाटय़ व चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘ऑल द बेस्ट’च्या सध्याच्या प्रयोगात मयूरेश पेम, अभिजीत पवार, सनी मुणगेकर, खुशबू तावडे हे कलाकार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा