सातारा शहरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर पावसाने हजेरी लावली होती. अत्यंत उत्साहात झांज पथक, ढोल-ताशा, पारंपरिक वाद्ये आणि डॉल्बीच्या आवाजात मिरवणूक पार पडली.
नगरपालिका गणेशोत्सव मंडळाचा गणपती सायंकाळी मिरवणुकीसाठी आला. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडीक, उपनगराध्यक्ष अमोल मोहिते आणि अनेक अधिका-यांच्या उपस्थितीत खा. उदयनराजे भोसले यांनी आरती केल्यावर मिरवणुकीला सुरुवात झाली. येथील सम्राट मंडळाच्या गणपतीची सकाळी ११ वाजताच मिरवणुकीला सुरुवात झाली होती. नगरपालिकेच्या वतीने सर्व मंडळांचा स्मृतिचिन्ह, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येत होता. या मिरवणुकीत १६५ मंडळांनी सहभाग घेतला होता. अनंत चतुर्थीपूर्वी मंगळवारी १२१ मंडळांनी आपल्या गणपतीचे विसर्जन केले होते. सायंकाळी आलेल्या पावसाचा मिरवणुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. तरुणाईतल्या उत्साहाला उधाण आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा