चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू करण्याचे  विधानसभेत जाहीर होताच येथे फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शहर कॉंग्रेस समितीच्या वतीने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांचा सत्कार करण्यात आला. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण व आता पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून त्यांनी या जिल्ह्य़ात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज असल्याचे पटवून दिले.
 विधानसभेत महाविद्यालय चंद्रपूरला देण्याचे जाहीर होताच येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वाखाली शहर कॉंग्रेस अध्यक्ष गजानन गावंडे, पालिकेतील गटनेते संतोष लहामगे, अॅड.अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागापुरे, नगरसेवक रामू तिवारी, राजेश अडूर, सचिन कत्याल, सम्राट खांडरे तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी पुगलिया यांचा सत्कार केला, तसेच मिठाई वितरित केली.     

Story img Loader