औरंगाबाद जिल्ह्य़ातील बनावट डॉक्टर शोधण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरोग्य समितीने बनावट डॉक्टरांची माहिती घ्यावी व त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, असे आदेश देण्यात आले.
सिल्लोड व गंगापूर तालुक्यांतील संशयित डॉक्टरांचे अहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्य़ातील ६१ संशयितांची यादी आरोग्य विभागाने तयार केली. त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आरोग्य समितीने बनावट डॉक्टरांवर कारवाई करावी, तपासणीनंतर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, असे आदेश देण्यात आले. कन्नड तालुक्यात सर्वाधिक २४ बनावट डॉक्टर आहेत. औरंगाबाद शहरात ८, खुलताबाद व फुलंब्रीत प्रत्येकी १०, सोयगाव २, वैजापूर २ व पैठणमध्ये ३ बनावट डॉक्टर असल्याचे अहवाल आहेत. या बनावट डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासल्यानंतर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा