राज्य सरकारची अवस्था सध्या ‘दे धक्का’ वाहनांसारखी झाली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी या सरकारला मोठय़ा आंदोलनाचा धक्का देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार वसंतराव खोटरे यांनी येथे व्यक्त केले.
येथील रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशन पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार वसंतराव खोटरे होते, तर उद्घाटक म्हणून विदर्भ माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे माजी प्रांताध्यक्ष प्राचार्य का.शि. लाव्हरे होते. स्वागताध्यक्ष अॅड. किरण सरनाईक, प्राचार्य नीलेश देशमुख, विभागीय कार्यवाह अरविंद काकड, विकास सावरकर, राधा मुरकुटे, नीरज उफळे, आशुतोष लांडे, शारीरिक शिक्षक संघटनेचे प्रा. अरुण सरनाईक, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक ठाकरे, बाबाराव खांडेकर, शिक्षकेतर संघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पसारकर, प्राचार्य वारकड, लक्ष्मण अढाव, अशोक पोले, संजय भोयर, पंजाब नायक, विजय शिंदे, मंगेश धानोरकर, नागोराव चौधरी, संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ सोमटकर, पी.डी. देशमुख, प्राचार्य गिऱ्हे, धर्मेद्र दिनोरिया, प्राचार्य देशमुख, प्राचार्य साबळे, सुभाष कठाळे, प्राचार्य बाळासाहेब देशमुख, विमाशिचे जिल्हाध्यक्ष जनार्दन शिंदे, कार्याध्यक्ष विनायक उज्जनकर उपस्थित होते.
यावेळी आमदार खोटरे पुढे म्हणाले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ही शिक्षण आणि शिक्षकांच्या हितासाठी लढणारी ऐतिहासिक चळवळ आहे. निवडणुका आल्या की, अनेक संघटनांचे पीक येते. शिक्षकांची वैयक्तिक अथवा धोरणात्मक कामांविषयी कृती न करता काही लोक फक्त शुभेच्छा पत्रे पाठवण्याचे कामे करतात. शिक्षकांना शुभेच्छापत्रांची गरज नसून त्यांच्यासाठी ‘शुभ काम’ करण्याची गरज आहे. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ सभागृहात आणि सभागृहाबाहेरही लढत असताना विरोधक मात्र भाषणबाजी करून त्रुटी दूर करण्याचे स्वप्नरंजन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. स्वागताध्यक्ष अॅड. किरण सरनाईक, प्राचार्य का.शि. लाव्हरे, विकास सावरकर, अविनाश पसारकर, जनार्दन शिंदे, विनायक उज्जनकर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन तालुकाध्यक्ष गणेश खाडे यांनी केले, तर आभार जिल्हा उपाध्यक्ष वीरेंद्र वाटाणे यांनी मानले. या कार्यक्रमात जिल्ह्य़ातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा