जिल्ह्य़ात विविध शासकीय योजना व त्यांच्या अंमलबजावणीसाठी होणाऱ्या खर्चात ४० टक्के प्रमाण प्रशासकीय खर्चाचे असते. चालू आर्थिक वर्षांत जिल्ह्य़ात सरकारचा १ हजार ४८१ कोटी खर्च झाला. पैकी जवळपास ६०० कोटी खर्च प्रशासनावर झाला.
गावपातळीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, तलाठी, कृषी सहायक, शिक्षक, ग्रामसेवक, पोलीस शिपाई, आरोग्य सेविका यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ग्रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा कोषागार अधिकारी कल्याणराव औताडे यांनी ही माहिती दिली. गावपातळीवर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सरकारची प्रतिमा उंचावण्यास मदत करावी, असे आवाहन केले.
महिला-बालविकास अधिकारी भगवान मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. डी. भगत, कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी टी. के. व्यवहारे, जि. प. कृषी अधिकारी शिंदे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्रा. कुळकर्णी यांनी ताण-तणाव व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले. समारोपास जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) टी. के. नवले यांची उपस्थिती होती. जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांनी कार्यक्रमामागील हेतू सांगितला. सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

Story img Loader