कल्याण शहरातील वाहतूक कोंडी सोडविणारा गोविंदवाडी वळण रस्त्याची आडकाठी दूर होण्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एका तबेल्यामुळे या रस्त्याचे काम गेली दोन ते तीन वर्षांपासून रखडले आहे. या तबेल्याविषयी योग्य ती माहिती न्यायालयात मांडण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. प्रशासनाने तबेल्याच्या जागेच्या बदल्यात तीन पर्याय तबेला मालकासमोर ठेवले आहेत, अशी माहिती आयुक्त शंकर भिसे यांनी दिली.
पत्रीपूल ते दुर्गाडी पूल दरम्यानचा हा कल्याण शहराबाहेरून जाणारा रस्ता तयार झाला तर शिवाजी चौकमार्गे जी अवजड वाहनांची वाहतूक होते ती पूर्णपणे बंद होणार आहे. शहरात स्दिवस-रात्र मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. तीर यामुळे सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा वळण रस्ता लवकर पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. अगोदरच या रस्त्याला खूप विलंब झाला असल्याची कबुली आयुक्त भिसे यांनी दिली. या तबेले मालकाची मूळ परवानगी कोंबडी पालनाची होती. मूळ जागा वाढविण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वकिलाने न्यायालयात दिली. तबेले मालकासमोर वाडेघर येथील तबेल्यासाठी आरक्षित असलेली १४ गुंठे जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.विकास हक्क व चटई क्षेत्राचेही पर्याय मालकासमोर ठेवण्यात आले आहेत. सामंजस्याने हा विषय सोडविण्यात येत आहे, असे प्रभाग अधिकारी गणेश बोराडे यांनी सांगितले.
गोविंदवाडी वळण रस्त्याची कोंडी सुटणार!
कल्याण शहरातील वाहतूक कोंडी सोडविणारा गोविंदवाडी वळण रस्त्याची आडकाठी दूर होण्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
First published on: 06-12-2013 at 06:47 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govindwadi road problem will solve soon