धरणग्रस्तांच्या समस्यांचे निवारण करण्यात तसेच त्यांचे सुनियोजित पुर्नवसन करण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ) रामराजे नाईक-िनबाळकर यांनी केले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित नागनवाडी व आंबेओहळ प्रकल्प पुनर्वसन व बानगे उप कालवा संदर्भातील बठकीत ते बोलत होते.
नाईक-िनबाळकर म्हणाले, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम सुरू असून, प्रशासकीय पातळीवर योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत त्या संदर्भात बठक घेऊन प्रशासनाच्या कामाचा आढावा घेण्यात येईल. प्रकल्पग्रस्तांना दाखला उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी या वेळी संबंधितांना दिली.
कामगारमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जमीन मोजणी, भूसंपादन, भूवाटप अशा कामांचे नियोजन करून धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास शासन प्रयत्नशील असून त्या दृष्टीने चार गावांचे जमीन संकलनाचे काम पूर्ण झालेले आहे. येत्या काही दिवसात उर्वरित गावांचे जमीन संकलनाचे काम पूर्ण करण्यात येणार असून प्रकल्पग्रस्तांचे लवकरच पुनर्वसन  करण्यात येईल. बठकीत नागनवाडी, आंबेओहोळ, जांबरे, सर्फनाला, धामणी, उचंगी, सोनुल्रे अशा मध्यम व लघू प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी आमदार चंद्रदीप नरके, अपर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, राधानगरीचे उपविभागीय अधिकारी समीर िशगटे, गडिहग्लजचे उपविभागीय अधिकारी विवेक आगवणे, भूसंपादन उप जिल्हाधिकारी सुरेश जाधव, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता खलील अन्सारी, कार्यकारी अभियंता जो. जू. बारदेस्कर आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.