हिंगोलीसह सेनगाव, औंढा नागनाथ तालुक्यांतील २७ ग्रामपंचायती व तीन गावांतील प्रभागांत पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि. २६) मतदान होणार आहे. शनिवारी संध्याकाळी या गावांतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मतदान शांततेत पार पडावे, या साठी महसूल, पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, या ३ तालुक्यांतील निवडणूक क्षेत्रात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, या साठी सोमवारी सुटी जाहीर केली आहे. हिंगोली तालुक्यातील १४ ग्रा. पं.चा यात समावेश आहे. त्यासाठी ४१ केंद्रांवर १३ हजार २१४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सेनगाव तालुक्यातील ९ ग्रा. पं. व ३ गावांमध्ये प्रत्येकी एका प्रभागात पोटनिवडणूक होणार आहे. एकूण ३० केंद्रांवर १३ हजार ७९४ मतदार मतदान करणार आहेत. औंढा नागनाथ तालुक्यात ४ ग्रा. पं.साठी मतदान असून १२ केंद्रांवर ७ हजार ५१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर ग्रा. प.ची निवडणूक बिनविरोध झाली. कापडसिंगी, बोरखेडी, शेगाव सोडके व जाभरूण (बु.) या ४ गावांत प्रत्येकी एका प्रभागातील निवडणूक बिनविरोध झाली. कारेगाव व कडोळी येथील काही प्रभागात उमेदवारांचे नामनिर्देश पत्र न आल्याने ५ जागेवर मतदान न होता त्या रिक्त राहतील. हिंगोली तालुक्यातील ब्रह्मपुरी व भटसावंगी ग्रामपंचायतमध्ये प्रत्येकी ७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने १४ ग्रा. पं.मध्ये निवडणूक होणार आहे. २०० उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील मुर्तिजापूर सावंगी ग्रा. प.ची निवडणूक बिनविरोध झाली. शिरड शहापूर ग्रा. पं. निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. मंगळवारी (दि. २७) तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

Story img Loader