पसरणी (ता. वाई) येथे घेतलेल्या प्लॉटची नोंद करण्यासाठी ग्रामसेवक संतोष किरवे (रा. भुईंज, ता. वाई) यांना १४०० रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत कार्यालयातच पकडले.
ग्रामसेवक किरवे यांनी पसरणी येथे काम करीत असताना १३ जुलै २०१२ ते १२ फेब्रुवारी २०१३ या कालावधीत सिटी सव्‍‌र्हे नं १९ मधील नोंदीचा उतारा तक्रारदार शिवराम साळुंखे (रा. वाई) यांच्याकडे १५०० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १४०० रुपयांची मागणी केली ती स्वीकारत असताना पसरणी ग्रामपंचायत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी रंगेहाथ पकडले. वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी नऊ वाजता करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा