महाराष्ट्रात वारकरी साहित्याचे महत्त्व गेल्या अनेक दशकापासून आहे. वारकरी साहित्य समाजात अधिक वृद्धिंगत करण्याची गरज आहे. वारकरी साहित्यातील तत्वज्ञान, आचार व विचार समाजासाठी पोषक असे ठरलेले असून वारकरी साहित्याचे तत्वज्ञान युवकांमध्ये रुजवावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.
येथील देशपांडे सभागृहात मंगळवारी सामाजिक न्याय विभाग तसेच वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात पाचपुते बोलत होते. सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री शिवाजीराव मोघे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ह.भ.प. रामदास जाधव महाराज व अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र ही वीरांची, शूरांची आणि संतांची भूमी असल्याचे सांगून आदिवासी विकास मंत्री पाचपुते म्हणाले, या भूमीला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई ते संत एकनाथांपासून संत तुकाराम, बहिणाबाई यांच्या विचारांची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा लाभलेला हा देश आहे. समाजसुधारक शाहू, फुले व आंबेडकर हे महापुरुष महाराष्ट्राचे असून त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. पुरोगामी महाराष्ट्राची प्रगती त्यांच्या विचारधारेतून झालेली असून आपले राज्य त्यांच्या विचारांवरच वाटचाल करीत आहे, असेही पाचपुते यांनी सांगितले.  
 यावेळी रामदास जाधव महाराज यांचा प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये १८ कलाकार सहभागी झाले होते. त्यांनी कीर्तनातून समाजसुधारक तसेच संत महात्म्यांची महती सांगितली. या कार्यक्रमाला वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा