भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथे जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, तहसीलदार (महसूल) अभिजित भांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयातही जिल्हा माहिती अधिकारी देंवेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही बाबासाहेबांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा