बँकिंग विधेयकाच्या विरोधात गुरुवारी लातूर शहरासह जिल्हय़ात पुकारलेल्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देशभर झालेल्या संपाने लातूरसह जिल्हाभर बँका बंद होत्या. जिल्हय़ात अहमदपूर, उदगीर, लातूर येथे संपकऱ्यांनी निदर्शने करून सरकारचा व विरोधकांचाही निषेध केला. लातूर शहरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या क्षेत्रीय कार्यालय, स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या मुख्य शाखेसमोर, तसेच सेंट्रल बँकेसमोरील निदर्शनाचे नेतृत्व कॉ. धनंजय कुलकर्णी, प्रशांत धामणगावकर, सरस्वती हेड्डा, अंजली पाठक, उत्तम होळीकर आदींनी केले.    

Story img Loader