महापालिका आणि वझिरा गणेश निर्मिती या संस्थेच्या वतीने ‘आठ टिकल्यांची बाई’  हे पथनाटय़ पंचशीलनगरमध्ये सादर करण्यात आले.
प्रभाग २५ च्या नगरसेवक तथा पश्चिम विभाग सभापती माधुरी जाधव यांनी पुढाकार घेऊन हे पथनाटय़ सादर केले. स्त्रीभ्रूण हत्येचा  प्रश्नाविषयी जनजागृती होण्याच्या दृष्टीने हे पथनाटय़ सादर करण्यात आले. कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला पंचशील परिसरातील नागरिकांनी दाद दिली. कार्यक्रमापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मिलींद जाधव, बंटी नेवारे, संपत जाधव, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.     

Story img Loader