ठाणेकरांचा प्रवास सुरक्षित तसेच अधिक सुकर व्हावा, या उद्देशाने ठाणे महापालिकेने शहरात तयार केलेले हरित जनपथ आता प्रेमी युगुलांचे अड्डे बनू लागले असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील तीनहात नाक्याजवळ तयार करण्यात आलेल्या हरित जनपथाच्या हिरवळीवर सायंकाळी प्रेमी युगुले गुफ्तगू करण्यात दंग असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तयार केलेले जनपथ शहराचे नवे आकर्षण बनत असले तरी प्रेमी युगुलांच्या अश्लील प्रकारांमुळे त्यास गालबोट लागत आहे.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या संकल्पनेतून शहरात हरित जनपथ तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी दोन वर्षांपासून अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येत आहे. रस्त्यालगत असलेल्या पदपथामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते आणि अशा अपघातात नागरिकांना जीवही गमवावा लागू शकतो. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुरक्षित तसेच अधिक सुकर व्हावा, या उद्देशातून हरित जनपथ तयार करण्याचे काम सुरू झाले. दोन्ही बाजूंस हिरवळ आणि मधोमध पदपथ, अशा प्रकारे मुंबई-नाशिक महामार्गावरील तीनहात नाक्याजवळ हरित जनपथांची निर्मिती करण्यात आली. अरुंद रस्ते आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेले असतानाच पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या या जनपथामुळे ठाणेकरांना मर्ा्िनग वॉकचा नवा पर्याय उपलब्ध झाला. सकाळच्या सुमारास बहुतेक ठाणेकर मर्ॉ्िनग वॉक करताना जनपथावरील हिरवळीचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. तसेच जनपथ शहराचे आकर्षण ठरू लागले असून महापालिकेने अन्य भागांत अशा पदपथांची निर्मिती करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. मात्र, असे असले तरी उद्यानांप्रमाणेच जनपथ असल्यामुळे प्रेमी युगुलांनी गुफ्तगू करण्यासाठी तेथील जागा निवडली आहे.
सायंकाळी प्रेमी युगुलांचे जथ्थे..
मुंबई-नाशिक महामार्गावरील तीनहात नाक्याजवळ तयार करण्यात आलेल्या हरित जनपथावर सायंकाळी प्रेमीयुगुले मोठय़ा प्रमाणात बसलेले दिसून येतात. पदपथांवरील मोठय़ा झाडांमुळे विद्युत पोलचा फारसा प्रकाश पडत नाही. त्यामुळे झाडाच्या आड अंधारात प्रेमी युगुले गळ्यातगळे घालून गप्पा-टप्पा करण्यात रंगलेले असल्याचे पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, महामार्गावर असल्याने वाहने या ठिकाणी सहसा थांबत नाहीत. सव्र्हिस रस्त्यावर तसेच पदपथांवर सायंकाळी ठाणेकरांची फारशी वर्दळ नसते. त्यात झाडांमुळे होणाऱ्या अंधाऱ्या आडोशात प्रेमी युगुलांचे अश्लील प्रकार खुलेआम सुरू असतात. गेल्या काही महिन्यांपासून पदपथाशेजारील या सव्र्हिस रोडवर दुचाकी उभी करून प्रेमी युगुले गुफ्तगू करताना दिसून येतात.
हरित जनपथ प्रेमी युगुलांचे नवे अड्डे
ठाणेकरांचा प्रवास सुरक्षित तसेच अधिक सुकर व्हावा, या उद्देशाने ठाणे महापालिकेने शहरात तयार केलेले हरित जनपथ आता प्रेमी युगुलांचे अड्डे बनू लागले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-01-2014 at 06:58 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Greenary roads are new addas for lovers