लाच घ्यायचीय.. मग ही खबरदारी घ्या.. असे कायदे आहेत..आणि असा सापळा लावला जातो. हे पथ्य पाळा आणि ही काळजी घ्या.. मग खुशाल लाच घ्या. तुम्ही पकडलेही जाणार नाहीत.. लाचखोर अधिकाऱ्यांना हे अनमोल धडे दिले आहेत खुद्द शासकीय पंचांनीच. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जेव्हा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळे लावतो, तेव्हा शासकीय अधिकारी पंच म्हणून घेतले जातात. या पंचाना या कारवाई दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संपूर्ण कार्यपद्धती माहिती झालेली असते. त्यामुळे हे पंच स्वत: सावधगिरी बाळगत आपल्या इतर अधिकाऱ्यांना सावध करतात. हे पंच सध्या लाललुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांचे डोकेदुखी बनली आहे.
एखादा शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी पैशांची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्यावर कारवाई करतो. ही कारवाई असते सापळा लावून त्या संबंधित अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्याची. फिर्यादीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करतो. अशा कारवाई दरम्यान सापळा लावताना दोन पंच असणे बंधनकारक आहे. हा पंच शासकीय अधिकारीच असतो. महसूल खात्यातील प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यावर सापळा रचायचा असेल तर एक पंच हा प्रथम श्रेणी दर्जाचा अधिकारी (पण त्या विभागातला नसावा) अशी अपेक्षा असते. मग लाचलुचपत विभाग पंच म्हणून म्हाडाच्या क्लास वन दर्जाच्या अधिकाऱ्याला सोबत घेतात. हे दोन पंच सगळी प्रक्रिया पाहतात. त्यामुळे त्यांना लाच घेताना कुठल्या गोष्टी टाळाव्या, काय करू नये किंवा काय खबरदारी घ्यावी याची इत्थंभूत माहिती झालेली असते. कायदे काय आहेत, पळवाटा काय आहेत, हे त्यांना समजते. त्यामुळे हे पंच स्वत: ही खबरदारी तर घेतातच; शिवाय आपल्या सहकाऱ्यांनाही हे धडे देतात. अशा पंच बनलेल्या अधिकाऱ्यांनी नुकतीच इतर अधिकाऱ्यांना घेऊन एक कार्यशाळा घेतल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.
लाचखोर अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक कार्यशाळा!
लाच घ्यायचीय.. मग ही खबरदारी घ्या.. असे कायदे आहेत..आणि असा सापळा लावला जातो. हे पथ्य पाळा आणि ही काळजी घ्या.. मग खुशाल लाच घ्या. तुम्ही पकडलेही जाणार नाहीत.. लाचखोर अधिकाऱ्यांना हे अनमोल धडे दिले आहेत खुद्द शासकीय पंचांनीच.
आणखी वाचा
First published on: 23-04-2013 at 02:16 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidance work shop for currupt officer