जातीचा खोटा दाखला दिला म्हणून काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र गुलाटी यांचे नगरसेवकपद धोक्यात आले असून जिल्हाधिका-यांनी त्यांना व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना परवा (सोमवार) सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.
गुलाटी यांनी शाळेच्या कागदपत्रात खाडाखोड करून जातीचा खोटा दाखला तयार केला. नागरिकांचा मागास वर्ग या विभागातून दाखल्याचा आधार घेऊन निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले पराभूत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्रांताधिकारी व जातपडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला रद्द ठरवला होता. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, असा अर्ज केला होता. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी याप्रकरणी सोमवार दि. १० रोजी अंतिम सुनावणी ठेवली आहे.

Story img Loader