पैशांच्या देवाणघेवाणीवरून शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब थोरात यांनी ज्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला होता, त्याचा परवाना गेल्या डिसेंबपर्यंतचा होता. विशेष म्हणजे त्यांनी परवाना नूतनीकरणासाठी अर्जही केला नव्हता. या प्रकरणात थोरात यांच्या विरोधात अवैध हत्यार बाळगल्याचे कलमही लावण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्य़ात २ हजार ४१६ जणांकडे बंदूक व रिव्हॉल्व्हर चालविण्याचे परवाने आहेत.
बंदूक व रिव्हॉल्व्हरच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी एक सॉफ्टवेअरही विकसित केले आहे. अर्ज केल्यानंतर एक महिन्यात परवाना नूतनीकरण होईल, अशी प्रक्रिया या सॉफ्टवेअरमध्ये असल्याची माहिती पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी दिली. दर ३ वर्षांनी परवाना नूतनीकरण केले जाते. पूर्वी माजी सैनिकांना परवाने देताना काही अटी शिथिल केल्या होत्या. त्या आता बंद आहेत. एखाद्याच्या जीविताला धोका आहे की नाही, तसेच भोवतालची परिस्थिती कशी आहे यावरून हत्याराचा परवाना दिला जातो. मंगळवारी गोळीबारात ज्या माजी नगरसेवकाने गोळीबार केला होता, त्याच्या परवान्याचे नूतनीकरण झाले नव्हते. त्याच्या विरोधात अवैध हत्यार बाळगल्याचे कलमही लावण्यात येणार आहे.

Story img Loader