येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय गुरू रविदास साहित्य संमेलनात विविध परिसंवादांच्या यशस्वी आयोजनासह तब्बल १२ ठराव घेण्यात आले. या ठरावात सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह करण्यात आला आहे.
संमेलनात पारित केलेले ठराव असे : उस्मानाबाद जिल्हय़ातील बाणणी येथे चर्मकारी समाजाच्या व्यक्तीला हनुमान मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्याचा जाहीर निषेध. सोलापूर विद्यापीठाला गुरू रविदासांचे नाव द्यावे. देशातील सर्व विद्यापीठांतून गुरू रविदास अध्यासन केंद्र स्थापन करावे. गुरू रविदासांची प्रतिमा असलेली नाणी निर्माण करावी. देशाची संसद व राज्याच्या विधान भवनासमोर गुरू रविदासांचे पुतळे उभारावेत. गुरू रविदासांच्या साहित्यावर संशोधन करण्यासाठी लेखक व संशोधकांना अनुदान द्यावे. म. बसवअण्णा, गुरू रविदास, संत हरळय्या, संत ककय्या, माँ जिजाऊ, संत तुकाराम यांच्या साहित्याचा शालेय व महाविद्यालयात समावेश करावा. गुरू रविदास साहित्य संशोधन केंद्र व वाङ्मय प्रकाशन मंडळाची स्थापना करावी. सरकारतर्फे गुरू रविदासांचे समग्र वाङ्मय प्रकाशित करावे. संसद व विधान भवनात गुरू रविदासांचे तेलचित्र लावावे. गुरू रविदास, संत हरळय्या, संत ककय्या यांचे टपाल तिकीट प्रकाशित करावे. तसेच रविदास जयंती शासनस्तरावर साजरी करावी. सर्व शासकीय कार्यालयांतून या महामानवाच्या प्रतिमा लावण्याचे आदेश काढावेत. गुरू रविदासांनी भेट दिलेल्या वेरूळ (औरंगाबाद) येथे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावे.
हे ठराव केंद्र व राज्य सरकारला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. संमेलनाध्यक्ष डॉ. जयदीशचंद्र सितारा, संयोजक बालाजी जमदाडे व संस्थापक चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या सहीनिशी हे ठराव घेण्यात आले.
गुरू रविदास साहित्य संमेलनात १२ ठराव
येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय गुरू रविदास साहित्य संमेलनात विविध परिसंवादांच्या यशस्वी आयोजनासह तब्बल १२ ठराव घेण्यात आले. या ठरावात सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह करण्यात आला आहे. संमेलनात पारित केलेले ठराव असे : उस्मानाबाद जिल्हय़ातील बाणणी येथे चर्मकारी समाजाच्या व्यक्तीला हनुमान मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्याचा जाहीर निषेध. सोलापूर विद्यापीठाला गुरू रविदासांचे नाव द्यावे.
First published on: 17-11-2012 at 01:10 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru ravidas book festival 12 dision