आपल्या मोबाइलमध्ये आपण आवडती गाणी साठवून ठेवतो. यासाठी आठ जीबीपासून ते ६४ जीबीपर्यंतचे कार्डही वापरतो, पण अनेकदा मेमरी संपते आणि आपल्याला नाइलाजाने चांगली गाणी डिलिट करावी लागतात. आता आपल्याला हे करण्याची गरज भासणार नाही. कारण ‘गुव्हेरा’ या कंपनीने एक अ‍ॅप उपलब्ध करून दिले असून या माध्यमातून आपण एक कोटीहून अधिक बॉलीवूड किंवा हॉलीवूडची गाणी ऐकू शकतो.
अनेक संकेतस्थळांवर आपल्याला गाणी उपलब्ध होतात, पण यातील बहुतांश गाणी ही स्वामित्व हक्कांचा बंध करणारी असतात. यामुळे गुव्हेरा या कंपनीने २००८मध्ये कायदेशीर बाबी पूर्ण करून अधिकृतरीत्या गाण्यांचा खजिना सर्वासाठी खुला केला. या संकेतस्थळावर डाऊनलोड होणाऱ्या गाण्यामागे संगीतकार, गायक यांना मानधनही कंपनीतर्फे दिले जाते. याच कंपनीने आता एक मोबाइल अ‍ॅप लाँच केले असून ते प्ले स्टोअरवर आणि आयफोन स्टोअरवर उपलब्ध आहे.
या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण कंपनीच्या संकेतस्थळावर जातो आणि तेथे आपण आपल्या आवडत्या गाण्याची प्ले लिस्टही तयार करून ठवू शकतो. इतकेच नव्हे तर ही प्ले लिस्ट आपण आपल्या मित्रांबरोबर शेअरही करू शकतो.
या कंपनीने लिनोवा कंपनीशी टायअप केले असून लिनोवाच्या फोनमध्ये हे अ‍ॅप इनबिल्डच उपलब्ध होते. या अ‍ॅपमुळे आता आपल्याला फोनमध्ये गाणी सेव्ह करून ठेवण्यासाठी वेगळी जागा वाया घालविण्याची गरज भासणार नाही. या अ‍ॅपमधून गाणी ऐकण्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे भरावयाची गरज नाही. केवळ इंटरनेट सुरू असणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा