कुशाग्र बुद्धिमत्तेची उपजत देणगी मिळूनही कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे दर्जेदार शालेय अभ्यासक्रमाला मुकणाऱ्या खेडय़ातील गरीब, आदिवासी मुलांना घरबसल्या दर्जेदार शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सध्या ज्ञानवर्धिनी सामाजिक संस्थेने काम सुरू केले आहे.
शासनाची कोणत्याही मदतीशिवाय ज्ञानवर्धिनी शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष श्रीपाद तांबव्हेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे कार्य सुरू केले आहे. शिक्षणासह विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असलेले ज्ञान मिळावे हा ट्रस्टच्या कामाचा प्रमुख उद्देश आहे.
पहिलीपासून अभियंता शिक्षणापर्यंत प्रमुख परीक्षांची तयारीही या संस्थेमार्फत करून घेतली जाते. अनुभवी शिक्षकांकडून तयार करून घेतलेले दर्जेदार अभ्यासक्रमाचे साहित्य, सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येतात. या व्यवस्थेत बाजारीकरण नाही, असे अध्यक्ष तांबेव्हेकर यांनी सांगितले. ठाणे, कोकण, खान्देश, मराठवाडा, कोल्हापूर भागात संस्थेची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, त्यांना साहित्य देण्याची कामे सुरू आहेत. अधिक माहितीसाठी ९३२२९९९५२० क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा