गोकुळने जिल्हय़ातील लाखो दूध उत्पादकांचे जीवनमय उंचावलेले आहे. याचबरोबर सामाजिक बांधिलकी स्वीकारून वेगवेगळय़ा क्षेत्रात भरीव मदतदेखील केलेली आहे. खेळाडूंना गोकुळने सढळ हाताने नेहमीच मदत केली आहे, असे उद्गार राशिवडे (ता.राधानगरी) येथील अपंग धावपटू सदाशिव केशव जाधव यांनी गोकुळने केलेल्या सत्कारप्रसंगी काढले.
६० टक्के अपंग असलेल्या या खेळाडूने नुकत्याच झालेल्या प्रौढ मैदानी अॅथलॅटिक स्पर्धेत ५ हजार व १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले. केरळ येथे होणाऱ्या अपंगांच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांची गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये संचालक पी. डी. धुंदरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचवेळी तुरंबे ता. राधानगरी येथील पॉवरलिफ्टर महमद आब्बास मुल्ला याचा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, राजस्थान येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल व स्वीडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा