कोमसाप आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या पहाटे वडवली विभागातील रोटरी सभागृहात ‘प्रभाती सूर नभी रंगती’ हा भाव-भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. उदय पांचाळ आणि रेखा कर्पे यांनी ओंकार प्रधान, गुरू परमात्मा, प्रभाती सूर नभी रंगती, सूरज की गर्मी से, आली माझ्या घरी ही दिवाळी, दीपावली मनाये सुहानी, फुलले रे क्षण माझे, दिल भूम भूम करे आदी अनेक सदाबहार गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली. सुनील वेदपाठक यांनी त्यांना सुरेख तबला साथ केली. मंजिरी आठवले यांनी निवेदन केले.
राबोडीतही सुरेल दिवाळी पहाट
श्रीराम सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट संगीत मैफलीस राबोडी-आकाशगंगा-साकेत परिसरातील रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. जुनी-नवी हिंदी-मराठी सदाबहार भाव भक्ती गीते या मैफलीत सादर करण्यात आली. स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीवर्षांनिमित्त खास त्यांच्यावरील गाणी या मैफलीत सादर करण्यात आली. संगीतकार वसंत देसाई तसेच कवी वा. रा. कांत यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्याही अजरामर रचना मैफलीत सादर करण्यात आल्या. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीतील राजेश खन्ना यांच्यावर चित्रबद्ध केलेली गाणी सादर करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अमित दांडेकर, निशिगंधा जोशी, आसावरी पुराणिक, ओंकार मराठे या गायक कलावंतांना सुनील गोखले, नवीन मेहता, कमलाकार मेस्त्री आणि आशुतोष वाघमारे यांनी स्वरसाथ केली. संकल्पना आणि निवेदन मकरंद मुळे यांनी केले. यावेळी विधीज्ञ मनोज रायचा यांना हुतात्मा प्रसन्न रानडे शौर्य पुरस्कार देण्यात आला. माजी आमदार संजय केळकर, उप महापौर मिलिंद पाटणकर आदी यावेळी उपस्थित होते. सुप्रसिद्ध अभिनेते अंगद म्हैसकर यावेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा