अंध, मूकबधिर तसेच अपंग व्यक्तींना मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ वापरता यावे तसेच तक्रारी नोंदविता येण्यासाठी संपर्क, अशी माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणून मुंबई पोलीस डॉट ओआरजी हे संकेतस्थळ अद्ययावत केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी जागतिक अपंग दिनाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. अपंग व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींच्या संख्येत वाढ झाल्याने संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे ठरविण्यात आले. आगामी १५ दिवसांत नवीन स्वरूपातील संकेतस्थळ कार्यरत होणार आहे. अंध व मूकबधिर आणि अन्य अपंग व्यक्तींना संकेतस्थळ वापरता येईल, असे तंत्रज्ञान नॅसकॉम आणि बॅरीअर ब्रेक टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे.

Story img Loader